Tuesday, 30 July 2013

तिचा चेहरा सारखा सारखा सतावतो, आणि मग तिला असं कवितेत पाहतो . . : )

तिचा चेहरा सारखा सारखा सतावतो,
आणि मग तिला असं कवितेत पाहतो . . .

कवितेवर प्रेम करायचं म्हणतो
आणि प्रेमावरच कविता करतो,
प्रत्यक्षात जमत नाही
म्हणुन कवितेतच तिला पाहतो . . .

काळ्याभोर केसांत ती कधीच
नाही घालत गजरा,
भुवयांवरुन पापणीवर येणाऱ्‍या
बटेवरच खिळतात नजरा . . .

निळेशार निळे तिचे डोळे
पण त्यांची जादू कोणा न कळे,
होता काही फक्त चुकी अपुली
त्यांच डोळ्यात विस्तवही जळे . . .

नकटं नकटं तिचं छोटंस नाक
तरीपण त्याचा सर्वाँना धाक,
रुसते ती दिली नसता हाक
मुरडताना शोभा वाढवतो नाकाचा बाक . . .

लाल लाल चुटुक होट
हसताना पाण्यावर जशी गुलाबाची बोट,
बोलताना गुलाबाची पाकळी थरथरते
तेव्हाच खरे प्रेमळ मन कळते . . .

गोऱ्‍या गोऱ्‍या गालावर
गरज नाही सुचवायची,
तिळ नाही चेहऱ्‍यावर
उगाचच कशाला नजर लावायची . . .

चेहऱ्‍यावरची कविता तिच्या
कायम मनात ठेऊन असतो,
आणि मग तिला रोज रोज
असं कवितेतच पाहतो . . .


                    ----आबासाहेब . . . . .

                                (कुमार विश्वासराव मांढरे)

Monday, 29 July 2013

आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .



जन्माला आल्यापासुनच बहुतेक असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

शिक्षकांची मी शाळेत पर्वाच केली नाही,
अभ्यासाची त्यामुळेच खरी तारांबळ उडाली. . .
सगळ्यांच्या 'नापास होणार तु' या टोमण्याला,
दहावी पास झाल्यावरच मुळात मजा आली . . .
बहुतेक शाळेत असल्यापासुनच असं व्हायला लागलंय ,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

जीव तोडुन अभ्यास करायचा म्हणुन,
अख्खी अकरावी न दांडी मारता गेली . . .
तरीपण वरपास होऊन बारावी आली,
तिथेच पहिल्यांदा जीवनात विकेट उडाली . . .
आता कॉलेजात आलो तरी असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

थोडंस मोठं झाल्याची जाणीव काय झाली,
पण कळायच्या आधीच दारु-सिगरेट हाती आली . . .
गेल्या वर्षाँमधली कॉलेजवारी अजुनही नाही संपली,
इच्छा नसतानाही नोकरी शोधायची वेळ आली . . .
काय सांगु कॉलेजला राम राम ठोकला तरी असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

बाबांच्या पैशावर बिझीनेस करायची पाळी आली,
नफा तर जाऊद्याच पण फक्त तोट्याचीच बाजु झाली . . .
तेवढ्यात बाबांकडुन आईला एक खबर मिळाली,
आबासाहेबांसाठी एका गोड पोरीची जागा आली . . .
खरंच आईबाबांच्या गप्पा ऐकल्या तरी असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

विचार करुन करुन आता डोकं खटकायला लागलंय,
आता तर माझंच मन मला खायला लागलंय . . .
एवढं सगळं होऊनही आता चांगलं वागायला लागलोय,
अजुन बाकी आहे आयुष्याची कविता तरी असं व्हायला लागलंय . . .
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . .
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .



                                                                   --- आबासाहेब . . . . .
                                                                (कुमार विश्वासराव मांढरे)

Saturday, 27 July 2013

आपण बदललो तर जग बदलेल . . .

दिल्लीतल्या त्या चिमुरडीचा काहीच दोष नव्हता त्याचा तिरस्कार आणि निषेध करावा तितका कमीच आहे . . !
यात तिचा काही दोष नव्हताच . . . . !
आपल्याकडे पाश्चात्य संस्कृती जास्तच फोफावत चालली आहे (खासकरुन मुलीँच्याबाबतीत). . .
त्याचा परिणाम पुरुष जातीवर होतो . . .
त्या मुलीँकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो . . .
त्या पुरुषांची उत्तेजना वाढण्यास मदत होते . . .
मग कदाचित मानसिक विकारातुन दिल्लीतल्या त्या हरामखोरासारखे नराधम, लिँगपिसाट तयार होतात . . . . !
त्यामुळे सावध कोणी व्हायचं, वागणुक कशी असायला हवी हे आपलं आपणच ठरवावं . . . . !