Tuesday, 30 July 2013

तिचा चेहरा सारखा सारखा सतावतो, आणि मग तिला असं कवितेत पाहतो . . : )

तिचा चेहरा सारखा सारखा सतावतो,
आणि मग तिला असं कवितेत पाहतो . . .

कवितेवर प्रेम करायचं म्हणतो
आणि प्रेमावरच कविता करतो,
प्रत्यक्षात जमत नाही
म्हणुन कवितेतच तिला पाहतो . . .

काळ्याभोर केसांत ती कधीच
नाही घालत गजरा,
भुवयांवरुन पापणीवर येणाऱ्‍या
बटेवरच खिळतात नजरा . . .

निळेशार निळे तिचे डोळे
पण त्यांची जादू कोणा न कळे,
होता काही फक्त चुकी अपुली
त्यांच डोळ्यात विस्तवही जळे . . .

नकटं नकटं तिचं छोटंस नाक
तरीपण त्याचा सर्वाँना धाक,
रुसते ती दिली नसता हाक
मुरडताना शोभा वाढवतो नाकाचा बाक . . .

लाल लाल चुटुक होट
हसताना पाण्यावर जशी गुलाबाची बोट,
बोलताना गुलाबाची पाकळी थरथरते
तेव्हाच खरे प्रेमळ मन कळते . . .

गोऱ्‍या गोऱ्‍या गालावर
गरज नाही सुचवायची,
तिळ नाही चेहऱ्‍यावर
उगाचच कशाला नजर लावायची . . .

चेहऱ्‍यावरची कविता तिच्या
कायम मनात ठेऊन असतो,
आणि मग तिला रोज रोज
असं कवितेतच पाहतो . . .


                    ----आबासाहेब . . . . .

                                (कुमार विश्वासराव मांढरे)

No comments:

Post a Comment