Monday, 29 July 2013

आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .



जन्माला आल्यापासुनच बहुतेक असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

शिक्षकांची मी शाळेत पर्वाच केली नाही,
अभ्यासाची त्यामुळेच खरी तारांबळ उडाली. . .
सगळ्यांच्या 'नापास होणार तु' या टोमण्याला,
दहावी पास झाल्यावरच मुळात मजा आली . . .
बहुतेक शाळेत असल्यापासुनच असं व्हायला लागलंय ,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

जीव तोडुन अभ्यास करायचा म्हणुन,
अख्खी अकरावी न दांडी मारता गेली . . .
तरीपण वरपास होऊन बारावी आली,
तिथेच पहिल्यांदा जीवनात विकेट उडाली . . .
आता कॉलेजात आलो तरी असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

थोडंस मोठं झाल्याची जाणीव काय झाली,
पण कळायच्या आधीच दारु-सिगरेट हाती आली . . .
गेल्या वर्षाँमधली कॉलेजवारी अजुनही नाही संपली,
इच्छा नसतानाही नोकरी शोधायची वेळ आली . . .
काय सांगु कॉलेजला राम राम ठोकला तरी असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

बाबांच्या पैशावर बिझीनेस करायची पाळी आली,
नफा तर जाऊद्याच पण फक्त तोट्याचीच बाजु झाली . . .
तेवढ्यात बाबांकडुन आईला एक खबर मिळाली,
आबासाहेबांसाठी एका गोड पोरीची जागा आली . . .
खरंच आईबाबांच्या गप्पा ऐकल्या तरी असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

विचार करुन करुन आता डोकं खटकायला लागलंय,
आता तर माझंच मन मला खायला लागलंय . . .
एवढं सगळं होऊनही आता चांगलं वागायला लागलोय,
अजुन बाकी आहे आयुष्याची कविता तरी असं व्हायला लागलंय . . .
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . .
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .



                                                                   --- आबासाहेब . . . . .
                                                                (कुमार विश्वासराव मांढरे)

No comments:

Post a Comment