Tuesday, 8 July 2014

ओळख: चा(बा)हुलीची

     
     गावाला जाणं मला खुप आवडायचं
, आधी फक्त उन्हाळ्यातच आम्ही जायचो पण आता अचानकपणे गावला जायचं हे तर आमच्या घरच्यांच्या पाचवीला पुजलेले आहे कि काय असं वाटायला लागलाय. असो. कदाचित नातेसंबंधच एवढे मोठे झालेत, सौरी बनवलेत कि लग्न, साखरपुडा, बारसे, पुजा आणि वास्तुशांती हे असे आनंदमयी कार्यक्रमांसोबत कोणाची माती, दहावा, तेरावा, कार्य आणि श्राध्द यांपैकी एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा योग तीन महिन्यातून एकदा येतोच आमच्या वाट्याला...:) असो.
     आमच्या (म्हणजे माझी इच्छा नसतानाही) मुक्कामाचे शक्यतो  ठिकाण म्हणजे अनावडी (माझ्या मामाचे गाव) असायचे. तिथले लोक काही वाईट नाहीत पण तिरस्कार करण्यायोग्य थोडेफार आहेतच. मोठे आणि एकत्र कुटुंब आहे, साधारणपणे २० माणसाचं, चार भावाचं ते बंधुप्रेम आहे. आमचे मामा म्हणजे आमच्या सगळ्या भाच्यांना जणू कंसमामा वाटायचे. थोडेफार या गोष्टीत तथ्य आहे. मोठे मामा ते खूप लेक्चर द्यायचे, म्हणजे चांगले सांगायचे पण खूप प्रमाणात अतिरेक आणि अतिशयोक्ती पण करायचे मग त्यामुळे आम्हाला खूप तिरस्कार वाटायचा त्यांचा, आता नाही वाटत ती गोष्ट वेगळी आहे, असा म्हणण्यापेक्षा सवय झालीये पण त्यांनापण जाणीव झालीये मुले खूप मोठी झालीयेत आता, त्यांना कितपत बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे.
      आमच्या मामांचे घर म्हणजे पाटील घराणे, आडनाव शिंदे असले तरी मानाने पाटीलच गावाचे ते. साधारणपणे २० एकर जमीन(बागायत), तीन दुकाने, स्वतःची डेअरी, अर्ध्या एकरात अलिशान घर, तीस गुरे, गाड्या इत्यादी सर्व त्यांची आयुष्यभराची मेहनत. महादेवमामा(मोठे मामा) माथाडीमधून रिटायर्ड झालेले त्यानंतर सदाशिवमामा(दुसरे मामा) तेही बेस्ट मधून निवृत्त झालेले, त्यानंतर भगवानमामा(तिसरे मामा) हि व्यक्ती म्हणजे घराचा कणा, आधारस्तंभ. अगदी जहाल आणि थोड्या मवाळ स्वभावाचे नेतृत्व असलेल्या या मामानी वयाच्या एकविसाव्या वर्षी गावाच्या विकास सेवा सोसायटीचे चेअरमन हे पद पटकावले आणि तेही एकवीस वर्षे टिकवले, कदाचित अजूनही त्यांनी या पदावर अजून कित्येक वर्षे काढली असती पण अन्हुतपणे अख्ख्या गावावर आणि घरावर संकट कोसळले आणि हे मामा देवाला आवडते झाले..:( घर अगदी पोरके झाले पण देवापुढे कोणाचे काय चालेल. या मामांच्या पश्चात आता आबामामा(चौथे मामा) हे घराची धुरा सांभाळतात. घर आणि शेतीपुरातच संबंध असलेल्या घरच्यांना भगवान मामांच्या जाण्याने खूप त्रास सहन करावा लाहाला. हळूहळू आता मामांच्या मुलांनी आणि मामांनी मिळून आता घर सावरलेले आहे.
      पण शांततेचा मात्र आता भंग झालाय. कोणाचा कोणाला ताळमेळ नाहीये, अगदी धरून बांधून एकत्र राहिल्यासारखे हे लोक राहताहेत. खर तर सगळ्याच्याच मनात वेगळे रहायची भावना आहे पण मानहानी होऊ नये याकरिता हे एकत्र राहत आहेत. वाद एवढे वाढलेत कि आता मुलींची लग्न झाल्यांनतर वेगळे राहायचे असे ठरविले आहे.
      महादेव मामांची मनीषा, शीतल आणि वैभव, सदाशिव मामांचे प्रशांत आणि महेश, भगवान मामांचे शुभांगी, सोनाली आणि सत्यवान, आबा मामांचे प्रणाली, कल्पेश आणि अभिमन्यू. हे सर्व आमच्य मामांची मुले-मुली.
      या आमच्या मामांच्या घरात दोघांची लग्न एकत्र करायची अशी प्रथा या पिढीसाठी पडली आहे.म्हणजे भाव-बहिणीचे, बहिणी-बहिणीचे एकाच मांडवात लग्न. यामध्ये पहिले मनीषा आणि शुभांगी  यांचे लग्न झाले. त्यानंतर प्रशांत आणि शीतल यांचे जाहले.आता महेश आणि सोनाली यांच्यासाठी स्थळे पाहायचे चालू आहे. त्यानंतर वैभव आणि प्रणाली, म्हणजे सर्वसाधारणपणे येत्या २ वर्षात हि लग्न होतील. मुलींच्या लग्नाचा शेवट प्रणाली करणार.
      या सगळ्या पोरांशी माझी लहानपणापासूनच ओळख होती पण येणे
-जाणे खूप कमी असायचे. आम्ही भाऊ-बहिणच मुळात जायचो नाही तिथे, कारण आमच्यात थोडे गुण मुंबईचे होते त्यांना ते वेगळे वाटायचे आणि सगळे आम्हाला नावं ठेवायचे मग आमचा त्यांच्याबद्दलचा राग अजूनच वाढायचा. हळूहळू यामधल अंतर सगळ संपून गेलं. मोठे झाल्यावर प्रेमापोटी, नावं न ठेवून घेण्यापोती आणि गाठी-भेटी या हेतूने नात अजून जवळ होऊ लागल. सगळ्यांना आवडू लागलं आणि आमच्या मनातला तिरस्कार जवळ-जवळ गायब झाला.
      मामाच्या इथे खेळायला मुलांना आजिबात वाव नसतो, कामच इतके कि बोलू नका. फक्त जेवायला, शाळा-कॉलेजात जायला, आणि रात्रीच्या कॉमन वेळी झोपायला आणि इअतर वेळेत फक्त आणि फक्त कामे करायची. मग आम्हीही जायचो त्यांच्यासोबत कधी कधी कामे करायला, कधी कधी भांडायचो पण लगेच जागेवर यायचो, टोमणे वगैरे चालायचे पण तेवढ गोड मानून घ्यायचो. मामांच्या मुली म्हणजे लाजाळूची झाडेच जणूकाही, दाजी आलेत असं समजल कि लगेच गायब व्हायच्या , फक्त कसे आहात?, कस चाललाय? एवढाच आमच बोलन व्हायचं. अख्ख्या घरात प्रणाली फक्त सारखी रागात असायची, चिडायची. तिचा चेहरा पाहून लगेच कळायचं हिला आपला खूप राग येतोय आणि हे खरच होते. कदाचित तिचं म्हणन म्हणजे कशाला आलाय हा बावळट, फुकट शायनिंग करतोय, मुंबईला राहतो म्हणून काय हिरो लागून गेला कि काय मोठा. तरीही आपण मात्र थोडासा संयम आणि चांगुलपणा म्हणून तिला विचारायचे कशी काय आहेस? तिने मग खोटे हसायचे आणि फक्त 'बरी' असं म्हणायचं आणि निघून जायचं, ते मी घरातून पुन्हा जात नाही तोपर्यंत समोर यायचं नाही. तशी ती वाईट नाही पण समोरच्याची मनस्थिती ओळखायला, भावना, प्रतिक्रिया जाणून घ्यायला कमी पडायची आणि त्यामुळेच सारखी चिडत रहायची. तिच्यातही आता थोडा थोडा बदल होत गेला. व्यवस्थित पाहुणचार, घरातील जबाबदारी सगळ काही छान झाल. पण आता तीच ते नेहमीच लाजण आणि हसण आता अगदी जिव्हारी लागायला लागलं. तिच्याबद्लानंतर त्यावेळी तिची थोडीशी चाहूल लागली कि सगळं काही बेभान व्हायचं पण सगळ काही मनातच ठेवायचं, राहायचं आणि चेहरा निर्विकार होवून टाटा बाय बाय व्हायचं.....:)

                                                                                                 
                                                                                                    ----आबासाहेब. . . . .

                                                                                               ( कुमार विश्वासराव मांढरे)
                                                                                       

Saturday, 5 April 2014

जोकर.................:)

      उत्तम अशी पुन्हा एकदा जास्त जुनी नाही पण तशी पाहायला गेलात तर नवीनही नाही अशी आठवण घेऊन येतोय....:)
      याला कदाचित एकतर्फी प्रेम म्हणता येईल किंवा नाही सुद्धा....:) हा पण ते तीच कि माझ तेही सांगता येत नाही , कदाचित तसं नसेलही....:)
       प्रगती विद्यालय हि माझी एकुलती एक शाळा, एकुलती एक याकरिता कि तिचा शाळेचा कालावधी दोन शाळांमध्ये विभागला  होता, तिचं नाव जास्मिन( तीच लग्न झालाय त्यामुळे तिचे खरे नाव काय मी सांगू इच्छित नाही
....:)
       आमचा वाढदिवसही एकाच महिन्यातला
, हे मात्र आम्हाला शाळेत असल्यापासून माहित आहे....:) शाळेत ती आणि मी एकामागोमाग आणि एकाच ओळीत बसायचो....:) मस्ती तशी आम्ही जास्त करायचो नाही पण शांत पण कधी बसायचो नाही....:) एका वर्षीच्या होळीच्या दिवशी तिने मी तिच्या अंगावर पाण्याच्या बाटलीला झाकणावर होल करून पिचकारी बनवून तिच्या अंगावर पाणी उडवलं होते....:) तेव्हा तिची प्रतिक्रिया फक्त मजा एवढीच होती, पण आमच्या ग्रुपमधल्या इतर मुलांना हि गोष्ट पटली नाही आणि त्यांनी मला पकडून तिच्यासमोर नेले आणि तिला पाणी उडवायला सांगितले पण तिने तिच्याकडची अख्खी पाण्याची बाटली माझ्या अंगावर रिकामी केली....:) मला थोडासा आधी राग आला होता पण सुरुवात कदाचित मी केली होती त्यामुळे मीही जास्त मनावर घेतली नाही....:), हि गोष्ट सांगायचं महत्त्वाचं कारण म्हणजे साधारणपणे १० वर्षानंतर मला तिच्याकडूनच ऐकायला भेटली ....:) इतक्या वर्षांनी पण या गोष्टीची तिने मला आठवण करून दिली याचा मला खूप हेवा आणि माझ्यासाठी अभिमानही वाटला ....:)
         साधारणपणे दीड वर्षापूर्वी आम्ही पुन्हा एकदा भेटलो होतो
....:) तेव्हा फेसबुक हे असं माध्यम होते कि आपले जुने मित्र-मैत्रीण कदाचित पुन्हा भेटू शकतील ....:) मीही कधीतरी सर्च करायचो....:), कधी भेटलीच नाही...:) तशी खूप साध्या आणि सरळ स्वभावाची होती ती त्यामुळे मला वाटलं तिने अजून फेसबुक नसेल जॉईन केलं....:) आणि एक दिवस असाच सर्च मारता मारता तीच फेसबुकवर प्रोफाईल दिसलं लगेच रिक्वेस्ट पाठवली, नुकताच ओपन केलेलं होतं बहुतेक ....:) फोटो नव्हता, इन्फोर्मेशन पूर्ण नव्हती..., तरीपण रिक्वेस्ट पाठवून ठेवली....:) २-३ दिवसांत तिने रिक्वेस्ट अक्सेप्त केली खूप छान वाटलं...:) मेसेजवर बोलू लागलो...:) शाळेच्या खूप खूप गप्पांमध्ये दोघंही अगदी रात्र-रात्र  काढू लागलो....:) जवळ-जवळ दोन आठवडे आम्ही असं मेसेजवर बोलत होतो....:) आम्ही आमचे नंबर एकमेकांना शेअर केले....:) जवळपास ११ वर्षानंतर आम्ही प्रत्यक्षात बोलणार होतो, ती जॉबला असते असं तिने मला आधीच सांगितलं होतं त्यामुळे मी फोन केल्यावर ती कामात असेल तर असं विचार करून मी फोन नाहीच केला, पण तिला मात्र सरप्राईज द्यायची इच्छा खूप होती त्यामुळे तिनेच फोन केला, पण मी आवाज लगेच ओळखला आणि फोनवर लगेच बोलून गेलो," बोल जास्मिन "....:)
         असेच आम्ही रोज वेळ भेटेल तेव्हा बोलू लागलो, आमच्या इतर मित्र
-मैत्रींची चौकशी, चाललेली लाईफ याबद्दल चर्चा  इतर सगळं काही बोलायचो आम्ही , एके दिवशी तिने मला विचारलं कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे का तुझी, मी तसं पाहायला गेल तर तेवढ्या बाबतीत सावधच होतो, माझी गर्लफ्रेंड नाही असं निखळ आणि खर खर सांगून टाकलं....:), सोबत फक्त आवडायची एक मुलगी पण मुश्कील आहे असंही सांगून टाकलं......:), साहजिकच मीपण त्याउलट तिला विचारलं असता तिने सांगितलं कि माझ्या घरी लवमैरीज ला परमिशन नाहीये त्यामुळे मी असं काही विचारही नाही करत....:) हे ऐकून मलाही खूप छान वाटलं कि एकतरी मुलगी आहे अशी कि ती असं विचार करतेय, थोडंस मीही मग जरा विषयांतर करत तिला विचारलं तुला कोणी आवडत का तरी....;)
खूप उशीर झालाय असं बोलून हि गोष्ट तिने टाळली, मीही जास्त उत्सुक न होता त्या दिवशी चैटिंग थांबवून झोपुन गेलो
....:)
       नंतर दोन
-तीन दिवसांनी मी बोलता बोलता तिला विचारले लग्न कधी करतेस...;) तिने जरा सिरिअस होत होत मला सांगितलं मलापण शाळेत असताना एक मुलगा आवडायचा....:) मी तिला विचारलं मग आधी का नाही म्हणालीस, तर सरळ सरळ मला म्हणाली तुझ्यावर पूर्ण विश्वास आला नव्हता, आता विश्वास वाटतोय....:) तिच्या या झंपक कल्पनेने मी तेव्हा चंपक ठरलो होतो....:) काय माहित कुणास ठाऊक माझ मन थोडंस नाराज झालं होतं कारण आमचा अगदी जवळचा मित्र प्रतिक तिला खूप लाईक करायचा, हे तिलाही माहित होतं आणि आम्हा सगळ्यांना सुद्धा माहित होतं, मला वाटायला लागलं तिला सुद्धा तोच आवडत असावा....:) थोडी डेरींग करून मी तिला विचारलं....:) तिने मला तूच ओळख म्हणून सांगितलं, मी आपला शहाणपणा करत सगळ्यांची एक एक नावं घेत होतो अन ती नाही नाही म्हणत होती....;) सगळ्यात शेवटी मी प्रतीकच नाव घेतलं आणि माझाच जीव वर खाली होऊ लागला, ती म्हणाली मला माहित आहे त्याला मी आवडायचे पण तो पण नाही दोन दिवसांचा टाईम घे आणि ओळखून दाखव.....:) त्यानंतर तिचा आणि माझा दोन-तीन दिवस कॉन्तैक्ट्च होत नव्हता सारखा मोबाईल चेक करायचो पण नाही, ४ दिवसांनी रात्री १ वाजता तिचा मेसेज आला वसईला काकांकडे आलीये त्यामुळे कॉन्तैक्त नाही करता आलं....:) बोलता बोलता मी तिला विचारलं आता सांग मी हरलो, मला नाही ओळखता आलं कोण तुला आवडायचं ते....:) तर ती लगेच खरच नाही ओळखलस का, उलट-सुलट मलाच प्रश्न विचारायला लागली.... हो नाही हो नाही  करत करत तिच्या प्रश्नांची उत्तरे देऊन मीच शांत झालो....:) मग तिने अचानक विचारलं सांगु का कोण ते.....:) मी फक्त हो म्हणालो ..... अन ती म्हणाली अरे वेड्या तूच आहेस तो.....:) मी जाम शॉक झालो, मनात विचार केला हि एवढी देखणी, नाजूक पोरगी आणि मी आवडलो हिला......:) नंतर मला वाटलं हि माझी मस्करी करतेय....:) पण तसं काहीच नव्हत ती अजून सिरिअस होऊन मला बोलू लागली कि," खरंच मला अजून पण तू खूप आवडतो पण बोलायला भीती वाटायची, तुझी वाट पाहून म्हटलं तू काय बोलायचं नाहीस मीच बोलून टाकते....:)" ती बोलत होती अन मी ऐकत होतो....:) तरीही मी जरा भाव खात अग पण इतक्या लगेच निर्णय घ्यायचा म्हणजे मला भीती वाटतेय, तर म्हणाली मी काही तुला फोर्स करणार नाही तू जरी नाही म्हणालास आता तरी मला वाईट वाटणार नाही उलट मी माझ मन मोकळ केल्याच समाधान तरी राहिल....:) असं बोलल्यावर मी लगेच सावध होवून तिला म्हणालो अग तसं नाही मला पण तू तेवढीच आवडायचीस आणि आवडतेस....:) खरंच असं म्हणून तीही खुश झाली....:)
         इथून आमच्या प्रेमाला सुरुवात झाली
....:) हा पण आमच प्रेम हे फक्त फोन च्या माध्यमातूनच होतं.....:) तरी पण तिला मनातून भीती वाटायची, घरातून साथ भेटणार नाही याची खात्री तिला होतीच....:) तशी खूप समजूतदार आणि थोडी हळवी पण होती ती.....:) तिच्या हळव्या स्वभावामुळे मलाही भीती वाटायची ती आपल्यासोबत राहिल कि नाही आयुष्यभर....:( आणि तीच नेमकं हेच व्हायचं मी पण तिला कधी फोर्स नाही केला....:) मी तिला भेटूयात असं बोललो तर तिला जॉब मुळे जमत नव्हत...:) एक दिवस मी तिला फिरायल जाउयात का असं विचारलं  ती म्हणाली कुठे अन मी मुर्खासारखा बोलून गेलो 'अक्सा बीच'....:) मुळात मी तिकडे कधीच गेलो नव्हतो, नंतर बीचची माहिती काढली तेव्हा जर कसातरी वाटलं....:) पण तिने तेव्हा नकार दिला थोडं वाईट वाटलं पण तिने एक्स्प्लेन करून सांगितलं कोणी बघितलं तर बाहेर येन वगैरे वगैरे...:) मी तसा बालिश बुद्धीच होतो त्यावेळेस मी पण अगदी समजून घेतलं तिला...:) पण हि एक चांगली गोष्ट झाली.....:) तिच्या घरी लग्नाच वातावरण सुरु झालं होतं त्याकाळात....:) तिच्यासाठी स्थळे यात होती, ती पण समजून होती कि आपलं लग्न होणे शक्य नाही, मुळात ती आधीपासूनच लवमैरीज च्या विरोधात होती.....:) माझ्याजवळ प्रेम व्यक्त केल्यापासून अवघ्या चौथ्या दिवशी तिने मला समजवायला सुरुवात केली....:) मीही तिला त्रास होऊ नये म्हणून तीच म्हणन फक्त ऐकून घेतलं....:)
          तिने मला समजावताना सांगितलेली काही हि लक्षात राहिलेली तिची वाक्ये:

१
. आपण आपल्या घरात्ल्यांचाच जास्त विचार करूयात...:)
२
. तू समजूतदार आहेस आणि खूप शांत सुद्धा....:)
३
. मी आयुष्यभर तुला विसरणार नाही.....:०

      आता काय बोलू हिला आणि माझ्या मनाला असाच फक्त कायमस्वरूपी मी विचार करत राहिलो
.....:) ( जोकर झालाय माझा )

                            आबासाहेब....:)
                      ( कुमार विश्वासराव मांढरे )

Thursday, 13 February 2014

प्रेमाच्या या दिवसाला एवढी का किँमत यावी.....:)

प्रेमाच्या या दिवसाला एवढी का किँमत यावी, सगळे दिवस सोडुन आजच का आठवण यावी . . .
कालच्या अॅनुअलमधे त्या गोड शोनुलीला पाहावी, वाटत होतं प्रेम नको पण एकदातरी ती बोलावी . . .
सगळे दिवस सोडुन आजच का आठवण यावी . . . माझ्या या वागण्यावर मला आजच का दया यावी, इतर दिवसांपेक्षा आजच प्रपोजची हुरहुर वाटावी,
सगळे दिवस सोडुन आजच का आठवण यावी . . . आज बोलुनच टाकायचं तिला, अशी हौस ठेवावी, नेमका मी प्रपोज करावा अन् भावास माहीती व्हावी,
सगळे दिवस सोडुन आजच का आठवण यावी . . . दिवस खराब न व्हावा म्हणुन त्याने चुक ही सोडावी, खरंच असं असेल कि त्याच्या मनातही कोणी परी असावी,
सगळे दिवस सोडुन आजच का आठवण यावी . . . खरंच प्रेमाला एक दिवस तरी मोकळीक असावी, भावांनी आणि राज्यकर्त्याँनी ही विनंतीच समजावी . . .
सगळे दिवस सोडुन आजच का आठवण यावी . . .

प्रेमाच्या या दिवसाला एवढी का किँमत यावी, सगळे दिवस सोडुन आजच का आठवण यावी . . .
सगळे दिवस सोडुन आजच का आठवण यावी . . .

वेलंटाईन डे च्या खुप खुप शुभेच्छा . . .

                                       ----आबासाहेब . . . . .

                                   (कुमार विश्वासराव मांढरे)

Sunday, 17 November 2013

खुप प्रेम केलं होतं तुझ्यावर, खुप वाट पाहिली . . . . :)

आस तुझ्या प्रेमाची फक्त आसच राहिली,
व्यक्त नाही करता आलं प्रेम हि एक खंत राहीली,

इतक्या वर्षाँनी भेटलो पण मंगळसुत्रासोबतच पाहिली,
मनासोबत हृदयाला स्तब्धता त्यावेळेस वाहिली,

खोट्या माझ्या हास्यावर कदाचित तिला दया आली,
भरलेल्या डोळ्यांनी नी थरथरत्या ओठांनी म्हणाली,

खुप प्रेम केलं होतं तुझ्यावर, खुप वाट पाहिली . . .
खुप प्रेम केलं होतं तुझ्यावर, खुप वाट पाहिली . . .


                                       ----आबासाहेब . . . . .

                                   (कुमार विश्वासराव मांढरे)

Friday, 2 August 2013

खरंच आजचा दिवस चंद्राप्रमाणे असेल, पण उद्याचा दिवस नक्कीच अमावस्या भासेल . . .

आजकालच्या या फैशनेबल युगात, नाही फैशनेबल नाही . . .
पाश्चिमात्य युगात असं म्हटलेलंच योग्य वाटतं . . .
हा तर या युगात आपली अशी स्वतःची फैशन का तेच कळत नाही . . .
आपले लोक का कॉपी करतात पाश्चिमात्य लोकांची देव जाणे . . !
पाश्चिमात्य लोकांमध्ये सहसा एक असं दिसुन येतं कि एकदा मुलांची लग्न झाली कि आईबाप आणि मुलं वेगवेगळे राहतात . . .
पण माझ्या मतानुसार ते कोणत्याही प्रकारे रोज एकमेकांच्या सहवासात कॉन्टैक्टमध्ये असतातच . . . आपल्याकडेपण अशाच प्रकारे कॉपी व्हा
वे . . .त्याबद्दल खुपच छान वाटतं. . . . :)याऊलट आईबापाने खुप शिकवलेली आजकालची मुलं शिक्षणासाठी बाहेर जातात तिथे सेटल होतात पण इकडचं कॉन्टैक्ट तोडुन टाकतात . . .
इकडे आईबापाची काय अवस्था आहे हे पण पाहत नाहीत . . !
अशी एका मित्राची तयारी आम्ही मित्रांनी खोडुन लावली . . .
कायमस्वरुपीच निघाला होता आई बाबांना सोडुन नोकरीसाठी. . .
त्याच्याकडे पाहुन असं वाटलं बरं झालं जास्त शिकलो नाही . . . . :)



खरंच आजचा दिवस चंद्राप्रमाणे
असेल,
पण उद्याचा दिवस नक्कीच अमावस्या भासेल . . .

तुझा जन्म झाला तेव्हा आजी-आजोबांना,
आई-बाबांना खुप आनंद झाला असेल . . .
लहानपणी परिस्थिती नसताना हट्ट पुरवावयास,
त्यांचा तुझ्यासाठी किती जीव तुटला असेल . . .
खरंच आजचा दिवस चंद्राप्रमाणे
असेल,
पण उद्याचा दिवस नक्कीच अमावस्या भासेल . . .

प्रेम, संस्कार-शिक्षण याची जाणिव नसेल,
आजीला विचार तिला सारं काही माहित असेल . . .
आजी-आजोबांचे प्रेम तुला खुप मिळाले,
बहुतेक तुझ्या मुलांना याचीच कमी भासेल . . .
खरंच आजचा दिवस चंद्राप्रमाणे
असेल,
पण उद्याचा दिवस नक्कीच अमावस्या भासेल . . .

लढले ते आजोबा आयुष्यभर देशासाठी,
त्यांच्या आत्म्यास आज काय वाटत असेल . . .
ज्यांना देशाबाहेर हाकलुन लावले भविष्यासाठी,
त्यांच्याशीच का रे तुला एवढी जवळीक असेल . . ?
खरंच आजचा दिवस चंद्राप्रमाणे
असेल,
पण उद्याचा दिवस नक्कीच अमावस्या भासेल . . .

फक्त विदेशी नोकरीसाठी जाणार कुटुंब सोडुन,
त्याचं भविष्य देश-संस्कारासाठी क्षुल्लकच असेल . . .
काही जर करुन दाखवलंस इथेच,
तर आपला देश पहिल्या स्थानावर असेल . . .
खरंच आजचा दिवस चंद्राप्रमाणे
असेल,
पण उद्याचा दिवस नक्कीच अमावस्या भासेल . . .

अजुनही विचार कर तुझा देश आणि आई-बाबा,
या सुंदर जीवनात मित्रा एकदाच असेल . . .
वृद्धाश्रमाचा रस्ता जर त्यांना पहायला लावलास,
तर लक्षात ठेव तुझी माझ्याशी गाठ
असेल . . .
खरंच आजचा दिवस चंद्राप्रमाणे
असेल,
पण उद्याचा दिवस नक्कीच अमावस्या भासेल . . .



                                      ----आबासाहेब . . . . .

                                    (कुमार विश्वासराव मांढरे)

                                                    

फेसबुकवर एक प्रेमळ मुलगी भेटली, जी मला माझी स्वप्नपरीच वाटली . . :)

मी 'कधीच प्रेमात नाही पडायचं कोणत्याही मुलीच्या प्रेमात' असं ठरवणारा कदाचित पहिलाच मुलगा असेल . . . . :)
तरीही कदाचित ते शक्य न झाल्यामुळे चुकून फेसबुकमार्फत एका मुलीच्या प्रेमात पडलो आणि तेही अगदी मनापासुन . . . . :)
पहिलं प्रेम होतं हे माझं . . !
यावरुनच हि एक सुचलेली कविता . . . . :)


फेसबुकवर एक प्रेमळ मुलगी भेटली,
जी मला माझी स्वप्नपरीच वाटली . . .

ब्रोकन हार्ट नावाच्या पेजवर,
कोणीतरी चैट पोस्ट टाकली. . .
फेसबुकच्या एवढ्या जगात,
तिथेच कमेँट करावीशी वाटली. . .
बोलता बोलता ती मुलगी भेटली,
जी मला माझी स्वप्नपरीच वाटली . .
:)

ध्यानी मनी माझ्या नसतानाही,
नंबर मागायची तिलाच घाई वाटली. . .
फोनवरच्या गप्पांमध्ये भुलताना,
प्रेमाची मजलही तिनेच गाठली. . .
पहिलं प्रेम करणारी प्रेयसी भेटली,
जी मला माझी स्वप्नपरीच वाटली . . :)

नव्या नव्या प्रेमात जान गुरफटली,
पण याची जाणीव तिला कसली?
पडताळायची ठरवली भाषा तिच्या मनातली,
मित्रांकडे चौकशी केली थोडी चालु वाटली. . .
लग्न कधी करायचं असं विचारणारी ती भेटली,
जी मला माझी स्वप्नपरीच वाटली . . :)

खरंच खुप खुप खोटं ती वागली,
माझ्याआधीच ती बऱ्‍याच जणांना पटली. . .
प्रेमात माझ्या नाही कमी पडली,
पण तिला आजिबात लाज नाही वाटली. . .
मनावर अत्याचार करणारी अशी मुलगी भेटली,
जी मला माझी स्वप्नपरीच वाटली . . . . ;)


                                      ----आबासाहेब . . . . .
                                    (कुमार विश्वासराव मांढरे)

Tuesday, 30 July 2013

तिचा चेहरा सारखा सारखा सतावतो, आणि मग तिला असं कवितेत पाहतो . . : )

तिचा चेहरा सारखा सारखा सतावतो,
आणि मग तिला असं कवितेत पाहतो . . .

कवितेवर प्रेम करायचं म्हणतो
आणि प्रेमावरच कविता करतो,
प्रत्यक्षात जमत नाही
म्हणुन कवितेतच तिला पाहतो . . .

काळ्याभोर केसांत ती कधीच
नाही घालत गजरा,
भुवयांवरुन पापणीवर येणाऱ्‍या
बटेवरच खिळतात नजरा . . .

निळेशार निळे तिचे डोळे
पण त्यांची जादू कोणा न कळे,
होता काही फक्त चुकी अपुली
त्यांच डोळ्यात विस्तवही जळे . . .

नकटं नकटं तिचं छोटंस नाक
तरीपण त्याचा सर्वाँना धाक,
रुसते ती दिली नसता हाक
मुरडताना शोभा वाढवतो नाकाचा बाक . . .

लाल लाल चुटुक होट
हसताना पाण्यावर जशी गुलाबाची बोट,
बोलताना गुलाबाची पाकळी थरथरते
तेव्हाच खरे प्रेमळ मन कळते . . .

गोऱ्‍या गोऱ्‍या गालावर
गरज नाही सुचवायची,
तिळ नाही चेहऱ्‍यावर
उगाचच कशाला नजर लावायची . . .

चेहऱ्‍यावरची कविता तिच्या
कायम मनात ठेऊन असतो,
आणि मग तिला रोज रोज
असं कवितेतच पाहतो . . .


                    ----आबासाहेब . . . . .

                                (कुमार विश्वासराव मांढरे)

Monday, 29 July 2013

आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .



जन्माला आल्यापासुनच बहुतेक असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

शिक्षकांची मी शाळेत पर्वाच केली नाही,
अभ्यासाची त्यामुळेच खरी तारांबळ उडाली. . .
सगळ्यांच्या 'नापास होणार तु' या टोमण्याला,
दहावी पास झाल्यावरच मुळात मजा आली . . .
बहुतेक शाळेत असल्यापासुनच असं व्हायला लागलंय ,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

जीव तोडुन अभ्यास करायचा म्हणुन,
अख्खी अकरावी न दांडी मारता गेली . . .
तरीपण वरपास होऊन बारावी आली,
तिथेच पहिल्यांदा जीवनात विकेट उडाली . . .
आता कॉलेजात आलो तरी असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

थोडंस मोठं झाल्याची जाणीव काय झाली,
पण कळायच्या आधीच दारु-सिगरेट हाती आली . . .
गेल्या वर्षाँमधली कॉलेजवारी अजुनही नाही संपली,
इच्छा नसतानाही नोकरी शोधायची वेळ आली . . .
काय सांगु कॉलेजला राम राम ठोकला तरी असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

बाबांच्या पैशावर बिझीनेस करायची पाळी आली,
नफा तर जाऊद्याच पण फक्त तोट्याचीच बाजु झाली . . .
तेवढ्यात बाबांकडुन आईला एक खबर मिळाली,
आबासाहेबांसाठी एका गोड पोरीची जागा आली . . .
खरंच आईबाबांच्या गप्पा ऐकल्या तरी असं व्हायला लागलंय,
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .

विचार करुन करुन आता डोकं खटकायला लागलंय,
आता तर माझंच मन मला खायला लागलंय . . .
एवढं सगळं होऊनही आता चांगलं वागायला लागलोय,
अजुन बाकी आहे आयुष्याची कविता तरी असं व्हायला लागलंय . . .
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . .
आयुष्य माझं मलाच विचित्र वाटायला लागलंय . . . . .



                                                                   --- आबासाहेब . . . . .
                                                                (कुमार विश्वासराव मांढरे)

Saturday, 27 July 2013

आपण बदललो तर जग बदलेल . . .

दिल्लीतल्या त्या चिमुरडीचा काहीच दोष नव्हता त्याचा तिरस्कार आणि निषेध करावा तितका कमीच आहे . . !
यात तिचा काही दोष नव्हताच . . . . !
आपल्याकडे पाश्चात्य संस्कृती जास्तच फोफावत चालली आहे (खासकरुन मुलीँच्याबाबतीत). . .
त्याचा परिणाम पुरुष जातीवर होतो . . .
त्या मुलीँकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो . . .
त्या पुरुषांची उत्तेजना वाढण्यास मदत होते . . .
मग कदाचित मानसिक विकारातुन दिल्लीतल्या त्या हरामखोरासारखे नराधम, लिँगपिसाट तयार होतात . . . . !
त्यामुळे सावध कोणी व्हायचं, वागणुक कशी असायला हवी हे आपलं आपणच ठरवावं . . . . !